¡Sorpréndeme!

'महाराष्ट्रात मोठा भूकंप होण्याची ठाकरे सरकारला भीती' | Navaneet Kaur Rana | BJP | Maharashtra

2021-03-18 1,342 Dailymotion

'महाराष्ट्रात मोठा भूकंप होण्याची ठाकरे सरकारला भीती'
अमरावती : 'एनआयएने सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाहीतर सचिन वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यांच्या जीवाला धोका असून एनआयएने त्यांना संरक्षण द्यावे. येत्या काही दिवसांत मातोश्रीपर्यंत जातात अशा महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचे नाव या प्रकरणामध्ये समोर येणार आहे. बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार, असे धक्कादायक विधान खासदार नवनीत राणा यांनी केले.